ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वाहनाच्या धडकेत दुर्मीळ ऊदमांजराचा मृत्यू; वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर केले अंत्यसंस्कार

August 9, 202116:13 PM 26 0 0

उरण (संगीता सचिन ढेरे ) : उरण तालुक्यातील दादरपाडा-वडखळ उरण दरम्यानच्या हमरस्त्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक दुर्मीळ ऊदमांजर (asian palm civet) मृत वस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या ऊदमांजराची तपासणी, पंचनामा करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास उरण-दादरपाडा वडखळ दरम्यानच्या हम रस्त्यावरून सर्पमित्र महेश भोईर उरणकडे घरी परतत होते. दरम्यान, या रस्त्यावर एक दुर्मीळ ऊदमांजर दिसला. कुतुहलापोटी भोईर यांनी जवळ जाऊन पाहणी केली. साधारण ८ ते १० किलो वजनाचा आणि ३-४ वर्षाचा असलेला दुर्मीळ ऊदमांजर मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांनी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद मढवी, सदस्य दिलीप मढवी, पीयूष लोंगळे, सुंदर भोईर, शुभम मढवी यांना माहिती दिली. त्यांनी लोकेशन व मृत ऊदमांजराची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. वन कर्मचाऱ्यांनी मृत्युमुखी पडलेल्या ऊदमांजराची तपासणी, पंचनामा केला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद मढवी यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *