जालना (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतांनाही जिल्हा प्रशासन हातावर हात घालून बसले आहे. सात दिवसाचा सक्तीचा लॉकडाऊन जाहिर करुन सर्वसामान्यांच्या जिवीता सोबत खेळला जाणार खेळ तात्काळ थांबविण्यात यावा अन्यथा गंभीर परीणाम भोगावे लागतील असा कडक इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक संजोग हिवाळे यांनी दिला आहे.
कोरोना संसर्गाचा परीणाम हा फक्त सर्वसामान्य जनतेवर होत असून गर्भ श्रीमंत हेल्थ पॉलीसी घेऊन कोरोनावर मात करुन घरी येत आहेत. परंतु ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत व ज्यांची आरोग्य विभागात कोणतीही ओळख नाही अशा लोकांचा उपचाराअभावी बळी जात आहे. गेल्या काही दिवसापासून मृत्यु दर वाढला आहे. हा मृत्युदर का वाढला याचा जिल्हा प्रशासनाने विचार करावा. केवळ राजकरण करण्यासाठी आणि प्रशासनासह सरकारला विरोध करुन चर्चेत राहण्यासाठी काही राजकारणी लॉकडाऊनला विरोध करीत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. ज्यांना लॉकडाऊन नको आहे त्यांनी जिल्ह्यातील मृत्यु दर रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना कराव्यात. स्वतः जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सहकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखल संजोग हिवाळे यांनी केले आहे.
ज्यांना कोेरोना होते ते यातना भोगत आहेत. घरात बसून पत्र काढून लॉकडाऊनला विरोध करणे चालणार नाही. किमान गोरगरीबांच्या जिवाचा विचार करा, त्यांच्या परीवारातील कमावता व्यक्ती गेल्याने पुर्ण परीवार उघड्यावर पडला आहे तर अनेकांचे पुर्ण कुटुंबच कोरोनाने हिराऊन नेले आहे. गर्भश्रीमंत मोठ मोठ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत तर सर्वसामान्यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात पुरेशी जागा नाही. अनेकांना तर उपचारा अभावी मरण पत्कारावे लागले आहे. जिल्हा प्रशानाने तात्काळ कोरोनावर प्रतिबंध म्हणून लॉकडाऊन जाहिर करावा आणि कोरोना संक्रमीत रुग्णांना तात्काळ उपचार करुन मृत्युदर कमी करावा. अन्यथा गंभीर परीणाम भोगावे लागतील असेही संजोग हिवाळे यांनी म्हटले आहे.
Leave a Reply