जालना ( प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नद्यांना महापूर आले आहेत. शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिके, फळबागा उध्वस्त झाल्याने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना निकषांनुसार सरसकट नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य डॉ संजय लाखे पाटील यांनी मदत व पुर्नवसन मंञी विजय विड्डेटीवार यांच्या कडे केली. औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात मदत व पुर्नवसन मंञी विजय विड्डेटीवार यांनी आढावा बैठक घेतली.तत्पुर्वी डॉ. संजय लाखे पाटील यांनी भेट घेतली मराठवाड्यातील गंभीर परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अवस्थे विषयी माहिती देऊन सविस्तर चर्चा करत लेखी निवेदन दिले.
सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली . धरणे, लघु, मध्यम साठवण क्षमता असलेले तलाव, प्रकल्प, पुर्णपणे भरली आहेत. असे सांगून डॉ संजय लाखे पाटील यांनी अतिवृष्टी मुळे शेती पूर्ण पणे पाण्यात गेली असून खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, कापूस, तेलबिया, या नगदी पिकांसोबतच फळबागा आडव्या झाल्या आहेत. असे मदत व पुर्नवसन मंञ्यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना निकषांनुसार सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अशी आग्रही मागणी डॉ संजय लाखे पाटील यांनी केली. ना . विजय विड्डेटीवार यांनी मंञीमंडळ बैठकीत यावर विस्तृत चर्चा करून तातडीने योग्य निर्णय घेण्यात येईल. असे वचन दिले. या वेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार,अॅड.उत्तम राठोड, काँग्रेस सेवादलाचे प्रदेश संघटक शरद देशमुख उपस्थित होते.
Leave a Reply