ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगर पंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानासाठी 21 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

December 21, 202113:07 PM 40 0 0

जालना  :- जालना जिल्हयातील घनसावंगी,मंठा,जाफ्राबाद व बदनापुर ,तिर्थपुरी या पाचही नगरपंचायतीच्या सदस्य पदाचा सार्वजनिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या नगर पंचायतीच्या निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात दि. 21 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

नगरपंचायतीच्या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना व केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही सार्वजनिक सुटी लागु राहणार आहे. पाचही नगर पंचायतीसाठी मतदान सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत होणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, नितीन नार्वेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *