ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

एपीएम टर्मिनल्स मुंबई च्या वतीने सीएसआर फंडातून एमजीएम हॉस्पिटलला रुग्णवाहिका लोकार्पण

August 28, 202113:45 PM 58 0 0

उरण (संगिता पवार ) एपीएम टर्मिनल्स मुंबईने त्यांच्या सीएसआर फंडातुन नवी मुंबईतील वाशी येथील एमजीएम हॉस्पिटला रुग्णवाहिका नुकतीच लोकार्पण केली .


या रुग्णवाहिकेचा उपयोग उरण, पनवेल, सानपाडा, नेरुळ, सीवूड्स, बेलापूर, वाशी, कोपरखैरणे, घणसोली भागातील जवळच्या रुग्णांना होईल या मदत करण्याच्या हेतूने रुग्णवाहिका लोकार्पण केली आहे , सदर वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात पोहोचणे बेसिक लाइफ-सपोर्ट-सिस्टिम, अनालॉग ऑक्सिजन डिलीव्हरी सिस्टीम्स आणि फ्लोअर माऊंटिंग मेकॅनिझमसह ऑटोलोडर स्ट्रेचर ट्रॉली यासह जीवनरक्षक उपकरणे असलेली रुग्णवाहिका सुसज्ज आहे. रुग्णांना रुग्णालयात वेळेवर पोहचविणे व रुग्णांना लवकरात -लवकर ट्रीटमेंट मिळण्यासाठी रुग्ण वाहिकेची मदत होईल ,
या सोहळ्याला एपीएम टर्मिनल्स मुंबईचे प्रमुख -एचआर अँड ईआर सुनील सुजी, एजीएम ऍडमिनिस्ट्रेशन दर्शन सगदेव , संचालक डॉ.कल्याणी सेन, वैद्यकीय संचालक डॉ.नितीन कदम, हेड ऑफ मार्केटिंग अँड ऍडमिन अक्षय कुमार झा, एमजीएम हॉस्पिटल च्या व्यवस्थापक आणि ऍडमिनिस्ट्रेशन श्रीमती गीतांजली शेट्टी आदी उपस्थित होते .
बंदराने रुग्णवाहिकेची वैयक्तिक खरेदी सुरू केली आणि ती रुग्णालयाकडे सुपूर्द केली आहे . एमजीएम रुग्णालयाच्या वतीने रुग्णवाहिकेचे मेंटेनन्स आणि देखभाल केली जाईल आणि रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि वेळेवर उपचारांसाठी रूग्णांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात मदत करेल.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *