जालना ( प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणा सदृढ बनविणे ही काळाची गरज असल्याचे दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेस देश आणि परदेशांतून मदत मिळवून देण्यास जालना रोटरी क्लब सहाय्यभूत माध्यम राहील. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ जालना चे अध्यक्ष रो. महेंद्र बागडी यांनी दिली. युके महाराष्ट्र मंडळ लंडन यांनी रोटरी क्लब ऑफ जालना साठी पाठवलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स रुग्णसेवेसाठी जनकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले असून याचा लोकार्पण सोहळा जनकल्याण समिती कार्यालयात करण्यात आला. या सोहळ्यात रो. महेंद्र बागडी यांनी सदरील माहिती दिली.
यावेळी उपाध्यक्ष रो. किशोर देशपांडे , रो.हेमंत ठक्कर , रो. अनिल कुलकर्णी, जनकल्याण समितीचे अध्यक्ष रो. सुरेश मगरे, सुनील जोशी, संदीप देशपांडे, मोरेश्वर दळवी, दिलीप देशपांडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
जालन्यातील
रुग्णसेवेसाठी परदेशात स्थायिक असलेल्या भूमिपुत्रांनी पुढाकार घेणे ही अभिमानाची व गौरवास्पद बाब असल्याचे रो महेंद्र बागडी यांनी नमूद केले.
या महत्वपूर्ण व आरोग्यदायी प्रकल्पासाठी डॉ. हितेश रायठठ्ठा यांनी मोलाचे सहकार्य केले.
रुग्णसेवेसाठी डॉ. विजेंद्र इंगळे, वृषाल खांडके व संपूर्ण युके महाराष्ट्र मंडळच्या सभासदांनी पुढाकार घेतल्याबद्दल रो. हेमंत ठक्कर यांनी आभार मानले.
Leave a Reply