(जालना/प्रतिनिधी) : जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन सिमेंट कोटेस उद्योगाच्या कर्जाची फाईल मंजूर केली नाही म्हणून माझ्या विरोधात खोटी तक्रार देऊन माझी बदनामी करणाऱ्या दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी शहागड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक हेमंतकुमार चाहंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत हेमंतकुमार चाहंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नि. पी. स्वच्छता कामगार संघटनेच्या नावाने विकास इंगळे आणि विजय म्हस्के यांनी दि. 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या विरोधात खोटी तक्रार दिलेली आहे.या तक्रारीत जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन सिमेंट कोटेस उद्योगाच्या नावाने 25 लाखांची फाईल दि.10 फेब्रुवारी रोजी दाखल केली होती.ही फाईल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑनलाईन पोर्टलवर दिसत असून मला ही फाईल मंजूर करण्याचे अधिकारी नाही.त्यामुळे मी ती मंजूर करू शकलो नाही.यामुळे ते माझी बदनामी करून मला नाहक त्रास देत आहे.या दोघांनी माझ्या विरोधात खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले असून त्यात कोणतेही तथ्य नाही.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून मी दोषी आढळल्यास मला शासन करावे आणि जर मी दोषी नसेल तर मला न्याय देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यस्थापक हेमंतकुमार चाहंदे यांनी या निवेदनात केली आहे.
Leave a Reply