ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आक्षेपार्ह फेसबुक मजकूर प्रकरणी कारवाईची मागणी

January 28, 202113:15 PM 17 0 0

जालना:फेसबुक ग्रुपमध्येब्राह्मण समाज, राष्ट्रपुरुष, व हिंदू देवी देवतांबद्दल वारंवार आक्षेपार्ह लिखाण करण्याऱ्या समाजकंटकांवर त्वरित कार्यवाही करण्याबाबत दिनांक २७/०१/२०२१ रोजी अखिल भारतीय पेशवा संघटनेच्यावतीने सायबर पोलीस ठाणे व गोपनीय शाखेत निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली.निवेदनात म्हंटले की, फेसबुकवर कुलकर्णी, देशपांडे, जोशी या नावाचा ग्रुप तयार करून ब्राह्मण समाजावर वारंवार अश्लील पोस्ट करून वाटेल ती टीका टिप्पणी करून समाजाला विनायकाराण लक्ष्य करण्याचं काम काही समाजकंटक करत आहे.

यामध्ये जवळपास १० हजार पेक्षा जास्त लोकं असून महिलांचे प्रमाण देखील मोठया प्रमाणात आहे. महत्वाची बाब अशी कि त्या ग्रुपमधून बाहेर देखील पडता येत नाही. हा ग्रुप समाजकंटकांनी हायजॅक करून वातावरण बिघडण्याची उद्देशाने वाटचाल स्पष्ट दिसत आहे. तसेच या ग्रुपमध्ये हिंदू धर्माच्या देवी – देवतांबद्दल देखील चित्र विचित्र, आक्षेपार्ह मजकूर मुद्दामहून टाकून त्यांच्या विटंबनेचा प्रकार देखील वारंवार या ग्रुपमध्ये होत आहे. जातीपातींमध्ये भांडणं लावणे, जातीवाद वाढवणे या समाजकंटकांचा मूळ उद्देश दिसत आहे. महिलांबद्दल वारंवार अश्लील पद्धतीने पोस्ट करणे, कमेंट करणे हे सुरूच आहे. तरी आपण यांच्यावर त्वरित कडक कार्यवाही करावी ज्यामुळे असे प्रकार थांबवून पुढील अपप्रकारांना आला घालता येईल. तरी समस्त ब्राम्हण समाजाची व हिंदू देवी-देवतांची, राष्ट्रपुरुषांची बदनामी थांबावी व संबंधित समाजकंटकांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनांवर अमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, सुमित कुलकर्णी, अमोल पाठक, अमोल खलसे, शशांक कुलकर्णी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *