ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ तात्काळ जाहिर करा जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

October 5, 202113:32 PM 26 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या एका शिष्टमंडळाने आज सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, अभाकॉकचे. सदस्य भिमराव डोंगरे, जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रभाकर पवार, राम सावंत, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, सफाई कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, चंद्रकांत रत्नपारखे, डॉ. विशाल धानुरे या पदाधिकाऱ्यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले आहे.


अतिवृष्टीमुळे खरीप पीके पुर्णपणे उध्वस्त झाली असून फळबागा, मोसंबी पिकाच्या बाबतीत जालना जिल्हा राज्यात अग्रस्थानी असला तरी बुरशी रोगामुळे फळांची पडझड मोठया प्रमाणात होवून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. पंचनामा करण्याची कोणतीही परिस्थिती शिल्लक राहिलेली नसल्यामुळे जालना जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहिर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी अशी मागणी या निवेदनात शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *