उरण ( संगिता पवार ) अश्विन शुध्द प्रतिपदा अर्थात घटस्थापना ऑक्टोबरपासून होत असल्याने तालुक्यातील मूर्ती मूर्तीवर कारखान्यांमध्ये देवीच्या अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत. नवरात्र उत्सव दोन दिवसावर येयून ठेपला असल्याने उरण शहरातील श्रीकिशोर जगे यांच्या राजपाल नाका येथील सिद्धिविनायक कला केंद्र हे गेली २८ वर्षापासुनचे आहे येथे दुर्गा मातेच्या मूर्तीना रंगकाम करण्याचे काम सुरु आहे कारागीर रंग कामात मग्न झाले आहेत .असे सिद्धिविनायक कला केंद्र कडून सांगण्यात आले उरण तालुक्यात चिरनेर ,करंजा, मुलेखंड ,चाणजे ,केगाव बांधीलवाडी , सोनारी ,बोकडवीरा यादी ठिकाणी असलेल्या कारागीर मग्न झाले आहेत .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन नवरात्रौत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने संमती दिल्याने मंडळांनी या उत्सवाची लगबग सुरू केली आहे. मंडळाची मूर्ती प्रसंगी वेशभूषा स्पर्धा, आरोग्य शिबिरे याद्वारे गर्दी खेचण्यासाठी सार्वजनिक मंडळे सरसावली आहेत. जेवढी आकर्षक तेवढेच उत्सवाचे स्वरूप मोठे मानले जाते. कोरोना कमी झाला असला तरी गर्दीने तो वाढू शकतो, हे लक्षात घेऊन मर्यादित उंचीच्या मुर्ती बसवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने व शासनाचे निर्बंध असल्याने मूर्तीची उंची मर्यादित असल्याने व कार्यक्रमावर होणार नसल्याने बहुतांश मंडळांनी सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे आयोजन
अलंकार दागिने साज असलेल्या व कापडी साडीच्या मूर्तीची मागणी आहे. मोठ्या मूर्तीवर बंधने असल्याने नवरात्रौत्सवासाठी ज्वेलरीचा साज व कापडी साडी असलेल्या तीन ते चार फुटांच्या देवीच्या मूर्तीना सध्या विशेष मागणी आहे. -राहुल जितेकर, कुंभारआळी, पेण
करण्यात आले आहे. निर्बंध असल्याने साधारणपणे ३ ते ४ फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीची मागणी होत आहे.
मूतिकारांनी वाघ, सिंहावर, उभ्या त्याचप्रमाणे महिषासुरमदिनी, चंडीका, अंबिका, एकविरा, कोल्हापूरची अंबाबाई, माहूर गडावरची रेणुका, तुळजापूरची भवानी, नाशिकची सप्तश्रृंगी, सरस्वती, लक्ष्मी माता अशा विविध रुपातील मूर्ती तयार केल्या आहेत
Leave a Reply