ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजा अमोल गटविमा गृहनिर्माण संस्था अंबड येथील ओपन स्पेसवर झालेले अतिक्रमण काढण्याची गटविमा गृहनिर्माण कृति समितीची मागणी

February 15, 202121:14 PM 12 0 0

अंबड (प्रतिनिधी)  राजा अमोल गटविमा गृहनिर्माण संस्था अंबड येथील ओपन स्पेसवर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. संस्थेच्या सभासदांनी वारंवार अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन दिले होते. परंतू आजपर्यत कुठलीही कारवाई झालेली नाही. दि. 11 रोजी गटविमा गृहनिर्माण कृति समितीचे राज्याध्यक्ष फकिरा वाघ व राज्य सचिव एकनाथ मगर यांनी सभासदासोबत अंबड तहसिलदार कडवकर यांची भेट घेवून अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनासोबत सदरील संस्थेच्या जागेचे मालकी हक्काबाबत कागदपत्रे देण्यात आली. एन.ए. लेआऊट, पीआरकार्ड, नगर परिषद बांधकाम परवाना व सभासद यादी देण्यात आली. तसेच संबंधीत अतिक्रमण धारकांकडून मालकी हक्काबाबत कागदपत्रे मागवीण्यात यावी असे निवेदनात नमुद केले आहे. सात दिवसाच्या आत संबंधीत अतिक्रमण धारकांनी मालकी हक्काबाबत कागदपत्रे, पुरावे सादर न केल्यास नगर परिषद कार्यालय अंबड यांनी भुमिअभिलेख कार्यालय, अंबड यांच्याकडून जागेची मोजणी करून सदरील अतिक्रमण काढून संपुर्ण जागा संस्थेच्या मालकीची जागा संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी. अशी मागणी कृति समितीच्या वतीने करण्यात आली. सदरील निवेदनाच्या संदर्भाने तहसिलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसिलदार वसावे अंबड यांनी सहाय्यक निबंधक अंबड, मुख्य अधिकारी न.प.अंबड, पोलिस निरीक्षक अंबड, भुमि अभिलेख कार्यालय अंबड यांची बैठक बोलावून सदरील अतिक्रमणाबाबत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी कृति समितीचे राज्य अध्यक्ष फकिरा वाघ, राज्य सचिव एकनाथ मगर, निलेश राजपुत, जी.एन.घायतडक, आर.डी.आव्हाड, ए.व्ही.दोरके, गायकवाड कोडींबा, नामदेव जाधव, विलास जाधव, अशोक जाधव आदिंची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *