ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नदी पात्रातील गाळ पेर्‍याच्या बदल्यात गायरान जमिन देण्याची पालकमंत्री टोपे यांच्याकडे मागणी

March 2, 202217:04 PM 42 0 0

जालना । प्रतिनिधी – शहरातील कुंडलिका नदी पात्रामध्ये मल्लाव समाजाची काही कुटुंबे पिढीजात गाळ पेरा करून उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, खोलीकरण व गाळ उपस्यामुळे या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली असून या कुटुंबियांना गाळ पेर्‍याच्या बदल्यात गायरान जमिन देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मनोज देवरे यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावर पालकमंत्री टोपे यांनी याबाबत सकारात्मक विचार करून गायरान जमिन देण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना अन्य ठिकाणी जमिन उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेश दिले असल्याचेही श्री देवरे यांनी सांगिलले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जालना शहर आणि परिसरातून वाहणार्‍या कुंडलिका नदी पात्रामध्ये मल्लाव समाजाचे काही कुटुंब काही पिढ्यांपासून गाळपेरा करून उदरनिर्वाह करीत होते. परंतू आता काही सामाजिक संस्थांनी नदी खोलीकरण करून नदीमधील साचलेला गाळ उपसा करीत आहेत. त्यामुळे या मल्लाव समाजाच्या पन्नास साठ कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. नदीपात्रात गाळपेरा करून येथे पीक काढून कित्येक वर्षांपासून जो रोजगार होता तो आता बंद झाला आहे. त्यामुळे मल्लाव समाजाच्या कुटुंबांना शासनाने सरकारी पडीत गायरान जमीन शासनाच्या नियमानुसार देऊन लोकांवर होणार अन्याय थांबवावा अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर मनोज देवरी यांची स्वाक्षरी आहे.
पालकमंत्री राजेश टोपे यांना मनोज देवरे यांच्या शिष्टमंडळाने भेटून हे निवेदन दिले यावेळी श्री टोपे यांनी तातडीने उपविभागीय अधिकारी यांना जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश दिले असून लवकरच मल्लाव समाजाच्या रोजगाराचा व उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या शिष्टमंडळात संतोष सलामपुरे, रमेश मुळे, अर्जुन कणिसे, मनोज घडे, रामसिंग घडे, विरू देवरे यांचा समावेश होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *