ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिलांवरील वाढत्या अत्याचारा विरोधात जनवादी महिला संघटनेची निदर्शने

September 15, 202113:27 PM 20 0 0

उरण (संगीता ढेरे ) मुंबईतील साकिनाका येथे एक महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्त्या करण्यात आली.याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले.या घटनेचा रायगड जिल्हा जनवादी महिला संघटनेने उरण येथील पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत सदर घटनेचा जाहीर निषेध केला. यावेळी पोलिसांना निवेदन ही देण्यात आले.राज्याच्या राजधानीत व देशाच्या राजधानीत महिलांवर सामुहिक बलात्कारा करून मारून टाकण्याचे प्रकार भयंकर वाढत चालले आहेत.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याची विकृती फोफावतांना दिसते.

महिलांच्या बाजूने कायदे नूसते कागदावर लिहून ठेवले आहेत.त्याची अंमलबजावणी केली जात नाही .कायदयातून पळवाट काढून आरोपी मोकाट सुटले जातात.काही वेळेला वैद्यकीय तपासणी वेळेवर होत नाही.अशा त्रुटी ठेवल्या जातात.अशा वेळेला कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.मुंबईत महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिला अमानुष मारहाण केली त्याचा जनवादी महिला संघटनेने तीव्र निषेध केला आहे. निवेदनात महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित अटक करा,पीडित महिलेच्या घरातील कुटुंबियांना संवरक्षण द्या,पीडित महिलेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेतून तातडीने आर्थिक मदत द्या,आरोपींना शिक्षा करण्यासाठी पोलीस यंत्रणा राबवून खटला जलदगती न्यायालयात चालवा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील,रायगड जिल्हा अध्यक्ष अमिता ठाकूर,कुसुम ठाकूर,नीरा पाटील,तारा ठाकूर,नाहिदा ठाकूर,सविता पाटील,कुंदा पाटील,समिया बुबेरे व हुसेना शेख यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *