ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा : ओमप्रकाश चितळकरबांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर

October 7, 202115:43 PM 33 0 0

जालना ( प्रतिनिधी) :मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. खरिप हंगामातील पिकांसह फळबागा ही उध्वस्त झाल्या आहेत. रब्बी हंगामातील पिके घेण्याची आशा धुसर झाली. परिणामी शेतकरी पुर्ण पणे खचले असून शासनाने पंचनाम्यांचे गुऱ्हाळ न करता सरसकट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करावी. अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर यांनी आज केली. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या सूचनेवरून ओमप्रकाश चितळकर यांनी बुधवारी ( ता. 06) नुकसानग्रस्त पुणेगाव, इस्लामवाडी, पोकळवडगांव, हिस्वन आदी गावांत बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या तसेच लवकर मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार ला भाग पाडणार असल्याचा दिलासा दिला.


ओमप्रकाश चितळकर या वेळी म्हणाले, खरिप हंगामातील उडीद, मुग, सोयाबीन, कापूस, ही नगदी पिके काढण्यास योग्य झाली असतांना निसर्गाचे दुष्टचक्र पुन्हा सुरू झाले.असे ओमप्रकाश चितळकर यांनी नमूद केले.
जालना जिल्ह्यात गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे उडीद, मुग या नगदी पिकांवर साजरे होणारे दसरा, दिवाळी ह्या सणांवर पुर्णपणे काळोख पडला आहे. असे सांगून ओमप्रकाश चितळकर म्हणाले, नगदी पिके वाहून गेल्याने सण तर नाहीच मात्र जगण्याची भ्रांत शेतकऱ्यां समोर निर्माण झाली आहे. असे ओमप्रकाश चितळकर यांनी सांगितले. कोरोना महामारी च्या संकटात संपूर्ण जगास आपल्या कष्टाने वाचवणाऱ्या बळीराजास वाचविण्यासाठी राज्य शासनाने सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची मदत तात्काळ जाहीर करून दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी ओमप्रकाश चितळकर यांनी केली. या वेळी रासपाचे तालुकाध्यक्ष अॅड. संभाजी चुनखडे ,पुंजारामजी खरजुले, नारायण चोरमारे, कारभारी अंभोरे, अमोल खरात, सय्यद ख्वाजा, अर्जुन इंगळे, परमेश्वर करपे, उत्तम खंदारे, कृष्णा खंदारे, शिवाजी चोरमारे, शंकर खरजुले, दत्ता उगले यांच्या सह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *