जालना प्रतिनिधी : सोमवार दि. २५-१०-२०२१ रोजी राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्राप्त उपजिल्हाधिकारी अंजली अभय धानोरकर हे जालना येथे प्रशिक्षणार्थी पोलीसांना स्वत:च स्वत:चा विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणार आहे. उपजिल्हाधिकारी अंजली अभय धानोरकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मुख्यमंत्री यांच्याहस्ते मिळालेला आहे. तसेच उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणुन त्यांना गौरवण्यात सुध्दा आलेले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले असुन त्यांनी अनेक प्रशासकीय जवाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल त्यांना शासन स्तरावर सन्मानीत सुध्दा केले गेलेले आहे. त्यांनी बाल कथा संग्रह ‘गट्टीफु’, ‘मनतरंग’ इत्यादी लिहुन प्रकाशित केले आहे तर ‘शामची आई’ या पुस्तकाच्या अभिवचनाचे ऑडीयो सुध्दा त्यांनी केलेला आहे व त्याचे प्रकाशन पद्मश्री धनराज पिल्ले यांनी केलेले आहे.
अनुकंपा धर्तीवर पोलीस खात्यात असलेल्या पोलीस प्रशिक्षणार्थ्यांना ते मार्गदर्शन करतील, जेणेकरुन भविष्यात लोकांची अडचण सहजरित्या समाजपयोगी दृष्टीकोण ठेवुन निवारण करण्याचे बळ तथा स्वतः कार्य करण्याची प्रेरणा प्रशिक्षणार्थ्यांना या मार्गदर्शन सत्रातुन मिळणार आहे व भविष्यात यामुळे चांगले पोलीस प्रशासन जनहितात कार्य करेल. रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपावले यांच्या प्रेरणेने रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.
प्राचार्य तथा अतिरिक्त पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांनी रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन व रोटरी परिवार यांचा या उपक्रमाचे कौतुक केले असुन अशा शिबिराशी गरज असल्याचे मत सुध्दा प्रकट केले असुन या मार्गदर्शन सत्रात रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अँड महेश धन्नावत, सचिव प्रशांत बागडी व रोटरीचे उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादीया, रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष श्री महेंद्र बागडी, रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोचे अध्यक्ष संजय राठी, रोटरी क्लब ऑफ जालना सेंट्रलचे सी.ए. सागर कावना, रोटरी क्लब ऑफ जालना इलाईटचे अध्यक्ष श्रीकांत दाड तथा रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित राहणार आहे.
Leave a Reply