जालना,दि.24 (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर वाढत्या महागाई व पेट्रोल- डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढलेल्या भरमसाठ दराविरुध्द शुक्रवार दि. 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जुना जालना गांधी चमन येथे उपोषण करण्यात येणार असून भारत बंदला पाठींबा देण्यात आल्याची माहिजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे सामान्य माणसांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. वाढती बेरोजगारीमुळे देशातील सुशिक्षीत तरुण सैरभैर झाला आहे. शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केंद्र सरकारला मागे घेण्यास चालढकल करुन हिटलरशाही पध्दतीने वागत आहे. दि. 26 मार्च रोजीच्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठींबा दर्शविला आहे. सदरील मागण्या संदर्भात जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सकाळी 11 वाजता उपोषण करण्यात येणार आहे. आ. कैलास गोरंंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, राम सावंत, विजय चौधरी, गट नेते गणेश राऊत, सौ. विमलताई आगलावे यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply