ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

घनसावंगी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू न देता मिशन मोडवर विकास कामे करणार : पालकमंत्री राजेश टोपे

October 9, 202114:24 PM 76 0 0

जालना  :- घनसावंगी नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून या शहराच्या विकासासाठी जवळपास 100 कोटी रुपयांच्या निधीतून शहराची गरज ओळखून अनेकविध विकासाची कामे करण्यात येत असून येणाऱ्या काळात या शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू न देता मिशन मोडवर विकास कामे करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. घनसावंगी शहरात साडेसहा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.


यावेळी कल्याण सपाटे, भागवत रक्ताटे, नंदकुमार देशमुख, राजेश देशमुख, बन्सीधर शेळके,रघुनाथ तौर , मधुकर देशमुख,भागवत सोळुंके,संभाजी देशमुख,भास्कर गाढवे,रमेश धांडगे,अशोक आघाव, प्रभाकरराव धाईत, बापूराव खटके, उपविभागीय अधिकारी श्री कापडणीस, तहसीलदार श्री देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, घनसावंगी नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून या शहराची गरज ओळखून अनेकविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. शहरासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना, अंतर्गत रस्ते, 100 खाटांचे रुग्णालय, नाट्यगृह, स्मशानभूमी, शादीखाना, सभामंडप यासह अनेकविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. या भागातील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपले भविष्य घडवावे यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्चून सर्व सुविधानियुक्त अशी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. शहरातील तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी व्यायामशाळेची उभारणी करण्यात येत असून शहरात काही आगसदृश घटना घडल्यास त्यासाठी अग्निशमन यंत्रणा यासारखी अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत.
प्रत्येक गोरगरीबाला त्याच्या स्वतःच्या हक्काचं घर असावं असे स्वप्न असते. घनसावंगी येथे 1 हजार 300 घरकुले मंजूर करण्यात येऊन गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगत ऊसतोड मजुरांच्या मुलां-मुलींसाठी दोन वसतिगृह मंजूर करण्यात आली असून येणाऱ्या काळातही शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
कोरोनावर मात करण्यासाठी लस ही कवचकुंडलाची भूमिका बजावत असून संपुर्ण राज्यात अधिकाधिक लसीकरण व्हावे या दृष्टिकोनातून 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मिशन कवच कुंडल हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपला जालना जिल्ह्यातही 100 टक्के लसीकरण व्हावे यासाठी या मोहिमेत जिल्हावासीयांनी अधिकाधिक प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *