ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धम्म हा वैज्ञानिक जाणिवांचा मूल्यकोष – डॉ. प्रकाश राठोड

February 16, 202214:37 PM 32 0 0

नांदेड – विज्ञानाच्या आणि धम्माच्या कसोट्या वेगळ्या नाहीत. त्या एकच म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांना अव्हेरणाऱ्या आणि जातीयवाद, धार्मिक कट्टरता, अंधश्रद्धा मानणाऱ्यांची वैचारिक पुनर्रचना होणे आवश्यक आहे. धम्म हा वैज्ञानिक जाणिवांचा मूल्यकोष आहे. धर्म मानणाऱ्यांच्या जाणिवा ह्या वैज्ञानिक नसतात. मनाच्या पुनर्रचनेसाठी धम्म जाणिवा अधिक प्रखर झाल्या पाहिजेत असे प्रतिपादन किनवट येथे आयोजित अकराव्या जागतिक धम्म परिषदेत आंबेडकरी विचारवंत डॉ.‌ प्रकाश राठोड यांनी केले. यावेळी डॉ. मनोहर नाईक, डॉ. सर्जनादित्य मनोहर, स्वागताध्यक्ष प्रा. मोहनराव मोरे, प्रशांत वंजारे यांची उपस्थिती होती.
जागतिक धम्म परिषदेच्या संयोजन समितीच्या वतीने १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भव्य अकराव्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्मपरिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘धम्म म्हणजे वैज्ञानिक जाणिवांचा परिपोष’ या विषयावर आयोजित धम्मचर्चेत डॉ. प्रकाश राठोड बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, आत्तापर्यंत धम्म जाणिवा नष्ट करण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केले आहे. धम्माचं तत्वज्ञान शोषणमुक्तीचं तत्वज्ञान आहे. जात, धर्म, पंथ तथा प्रांतांच्या अतित असलेली विशुद्ध माणूसकीची जाणीव ही धम्म जाणिवेच्या अंतरंगात असते. ही प्रगल्भता येण्यासाठी धर्मांध मानसिकतेच्या तृष्णांचे दमन करणे आवश्यक आहे, ही जबाबदारी आपल्यावरच आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रशांत वंजारे यांनी केले तर आभार सज्जन बरडे यांनी मानले. या सत्राच्या यशस्वीतेसाठी राहुल कापसे, दयाभाऊपाटील, संदीप कावळे, अभय नगराळे, अभिजित पाटील, जयरत्न अढागळे, मंगेश सरोदे, प्रज्ञाधर ढवळे यांनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *