जालना (प्रतिनिधी) : जालना तालुक्यातील तांदुळवाडी खुर्द येथील सम्राट कृषी फार्म हाऊस येथे सुरु असलेल्या 10 दिवसाच्या श्रामणेर शिबिरात 100 तरुणांनी बौध्द धम्माची दिक्षा घेतली आहे. या शिबिराचा समारोप दि. 18 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार असून या समारोप कार्यक्रमास हजारोच्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुधाकर निकाळजे यांनी केले आहे.
भारतीय बौध्द महासभा जालना शाखेच्या वतीने मागील 10 दिवसापासून श्रामणेर शिबिर सुरु आहे. या शिबिरात लहान मोठ्यासह सुमारे 100 जनांनी सहभाग नोंदविला असून 65 व्या धम्मक्र प्रवर्तन दिनानिमीत्त धम्मभुमी बुध्दविहार येथे भदन्त धम्मधर यांच्या मार्गदर्शनाखाली 65 जनांनी धम्मदिक्षा घेतली. दहा दिवसाच्या या शिबराचा समारोप 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या समारोप प्रसंगी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या शिबिराच्या समारोपास हजारोच्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply