जालना: जालना येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकारी विजय गणपत काळे यांची चौकशी करून रखडलेली कामे, कायमस्वरुपी वाहन चालवण्याचा परवाने मंजूर न केल्यास कलेक्टर कचेरीसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा जालना जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिलीप शिंदे यांनी म्हटले आहे की, आपण गेल्या २४ ते २५ वर्षांपासून आर.टी.ओ. कार्यालयासंबंधीत नागरिकांची प्रतिनिधी / संचालक म्हणुक कामे करुन देतो. कोरोनाच्या प्रदुर्भावापुर्वी माझ्या ड्रायव्हिंग स्कूल मार्फत प्रशिक्षण घेऊन चारचाकी, तीनचाकी व दोनचाकी वाहनाचे शिकाऊ अनुज्ञाप्ती (एल.एल.आर) काढले होते. परंतु मार्च २०२० ला लॉकडाऊन लागल्यामुळे संबंधीत नागरिक, विद्यार्थ्यांचे पक्क्या अनुज्ञाप्ती (लायसन्स) ची चाचणी लवकर न झाल्यामुळे शासनाच्या आदेशाने शिकाऊ एल.एल.आर च्या मुदत वाहुन मिळाल्या.
त्यानुसार (ए.आर.) टी.आर, एल.एम.व्ही. टी.आर) या अनुज्ञाप्ती (लायसन्सची) मॅन्युअल ५ नंबर लावुन संबंधीत नागरिक व विद्यार्थ्यांचे पक्क्या अनुज्ञाप्तीसाटी दि.१९ डिसेंबर २०२०ते मार्च २०२१ पर्यंत त्यांच्या पक्क्या अनुज्ञाप्ती लायसन्सच्या चाचण्या मोटार वाहक निरीक्षक सुळे , मोटार वाहक निरीक्षक पाटील , मोटार वाहक निरीक्षक पठाण , मोटार वाहक निरीक्षक सोळंके यांनी कार्यालयात अनुज्ञाप्तीसाठी चाचण्या घेतलेल्या असुन जालना जिल्ह्यातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे पक्के अनुज्ञाप्ती (लायसन्स) मॅन्युअल ५ नंबर लावलेले पास (अपुल) वरील मोटार वाहक निरीक्षक व सहाय्यक परिवहन अधिकारी श्री विजय गणपत काळे साहेबांनी लायसन्स अनुल (पास) केले आहे. परंतु दि. १९ डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ११५ते १२० विद्याथ्यांनी पक्क्या अनुज्ञाप्तीसाठी (लायसन्ससाठी) चाचणी दिलेली असुन, त्यामध्ये काही मोटार वाहक निरीक्षकाने थोड्याफार फाईलचे पहिले
अप्रूल केलेले असुन सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय गणपत काळे यांनी ८ते ९ महिने होऊनसुध्दा आद्याप माझ्या विद्यार्थ्याचे अनुज्ञाप्ती (लायसन्स) अप्रूप (पास) केलेले नाही. आपण त्यांना मॅन्युल५ नंबर त्याच प्रमाणे १४/१५ हजेरी रजिस्टर यांच्या सत्याप्रती देऊनही हे मला जाणुन बुजुन त्रास देत आहे. तुमच्या विद्याथ्यांचे लायसन्स अमूल करायचे असेल तर आपणास विजय गणपत काळे २ लाख रुपयांची मागणी केली आहे.आपण मागासवर्गीय असल्यामुळे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे शिंदे यांनी या निवेदनात म्हटले आहे.यासंदर्भात वरीष्ठांकडे वेळोवेळी लेखी व तोंडी सांगूनही अद्याप न्याय मिळाला नाही. यामुळे आपणास नागरिक,व विद्यार्थ्यांचे टोमणे व बोलणे सहन करावे लागत आहे. ज्या विद्यार्थ्याची लायसन्स आहे त्या विद्याथ्यांचे पोलीस भरतीची लेखी परिक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्यांना अनुशाप्ती (लायसन्सची) ची आवश्यकता आहे.येत्या १० ते १२ दिवसांमध्ये नागरिक विद्यार्थ्यांचे अनुज्ञाप्ती लायसन्स दोन्ही ही अप्रूल न झाल्यास व सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची चौकशी न केल्यास दि.२० सप्टेंबर रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही शिंदे यांनी या निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रती शिंदे यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्तआदींनाही पाठविल्या आहेत.
Leave a Reply