ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दिराने भावजयीचा गळा दाबून केला खून

September 20, 202112:58 PM 34 0 0

पिंपरी-चिंचवडजवळील घोराडेश्वर येथे एका दिराने भावजयीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भावजयीकडे आरोपी दिराने शरीर सुखाची मागणी केली होती. त्याला विरोध केल्याने तिचा गळा दाबून खून केला असल्याचं उघड झाल आहे. मिताली सोमनाथ दडस (१९) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तुकाराम कोंडीबा दडस याला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम दडस याचे मितालीशी एकतर्फी प्रेम होते. रविवारी तुकाराम दडस मितालीला घेऊन घोराडेश्वर येथे देवदर्शनासाठी डोंगरावर गेला होता. मितालीला पुढे घडणाऱ्या घटनेची काहीच कल्पना नव्हती. निर्मनुष्य आणि दाट झाडीत गेल्यानंतर आरोपीने मितालीकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्याला मितालीने विरोध केला. याचाच राग मनात धरून तुकाराम दडसने मितालीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केला आणि तेथून धूम ठोकली.
दरम्यान, सोमवारी मयत मिताली यांचे पती सोमनाथ यांनी पोलिसात येऊन चुलत भावाने मितालीसोबत घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा, त्यानेच मितालीचा खून केला असल्याचं उघड झाले. याप्रकरणी आरोपी तुकाराम दडस याला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *