ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे दिव्यांग तपासणी व प्रमाण पत्र वितरण शिबीर संपन्न

July 20, 202212:37 PM 23 0 0

उरण (संगिता पवार ) : आजादी का अमृत महोत्सव अनुषंगाने केंद्र शासनाच्या AKAM योजनेंतर्गत जिल्हयातील विकास कामांना गती देण्यासाठी अंत्योदय मोहीम राबविण्यात येत आहे .सदर अंत्योदय मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर मोहिमेचा एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींना त्यांचे प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्रे तातडीने मिळावीत या साठी जिल्हा रुग्णालय अलिबाग मार्फत इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीर मंगळवार ( दि. १२ ) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपेर्यंत आयोजित करण्यात आले होते .

जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड -अलिबाग आयोजित उरण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा साठी दिव्यांगत्वा चे वैदकीय प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या शिबिरात अस्थिव्यंग नेत्र विकार ,व मानसिक आजार याची तपासणी केली .जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुहास माने ,यांच्या मार्गदर्शनाखाली .व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण चे वैदकीय अधिक्षक गौतम देसाई ,सहाय्यक .अधिक्षक अनिल ठाकूर यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी झाले त्यात अलिबाग येथील सोशल वर्कर प्रतिमा फडतरे ,ग्रामीण रुग्णालय टीम ,अलिबाग जिल्हा सामान्यरुग्णालय टीम ने विशेष मेहनत घेतली .

या शिबिरात मानसिक विभाग १६ प्रमाण पत्र वाटप ,अस्थिव्यंग १७ प्रमाण पत्र वाटप , मानसिक आजार ४ प्रमाण पत्र वाटप करण्यात आले .एकूण ५६ दिव्यांगांची तपासणी करण्यात आली .

उरण तालुक्यातील दिव्यांगांनी तपासणी व प्रमाणपत्र ज्यांना पाहिजे असेल त्यांनी WWW.Swavlambancard.gov.in वर नोंदणी करावी असे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक गौतम देसाई यांनी सांगितले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *