ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वंचित बहुजन आघाडी जालना नगर परिषद निरिक्षकपदी सचिन कांबळे

February 1, 202212:16 PM 35 0 0

जालना (प्रतिनिधी) :  जालना नगर परिषद शहर प्रभारी निरीक्षकपदी सचिन कांबळे यांची वरिष्ठांच्या आदेशावरून दि. 30 जानेवारी रविवार रोजी शासकीय विश्राम गृह जालना येथे घेण्यात आलेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे पश्‍चिम जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, जालना शहरात 60 वार्डात वार्ड तिथे शाखा व बुध कार्यकारणी दहा व्यक्तीची व नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी करुन कालवध्द पध्दतीने जालना शहरात वार्ड निहाय कार्यक्रम राबविण्यात यावे. तसेच शहराध्यक्ष व शहर कार्यकारणी यांची तातडीने बैठक बोलावून त्यांच्या बरोबर पक्षाची सर्व कामे तातडीने मार्गी लावावी आणि त्यासंदर्भातील सर्व अहवाल पक्ष कार्यालयास सादर करावा असे या नियुक्तीपत्रकात म्हटले आहे. या नियुक्तीबद्दल सचिन कांबळे यांचे सर्व वंचित घटकातून अभिनंदन होत आहे. आगामी काळात होवू घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सर्व वार्डात विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे निरीक्षक सचिन कांबळे यांनी सांगीतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *