ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दिशाहीन झालेले पालक …की… दिशाहीन झालेला तरूण वर्ग…

October 27, 202114:57 PM 56 0 0

सध्या आपल्या राष्ट्राची नवीन पिढी नीतीमत्ताहीन झाली आहे. मुले कार्टूनसारख्या विकृत कार्यक्रमांच्या आहारी जात आहेत. मुलांमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा राहिलेली नाही. मी आणि माझे अशा संकुचित मानसिकतेची, हिंसक, संस्कारहीन पिढी निर्माण होत आहे. याच मानसिकतेमधून नांदेडमधील वैभव नगर भागातील तरूण मुलाने एका तरूण मुलाची प्रेमाला नकार दिला म्हणून किरकोळ वादातून गळा कापून व अंगावर चाकूने 17 वा करत निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच उघड झाली. या मुलाला अटक केले असता त्यांच्या चेहऱ्यावर कुठेलेच केलेल्या अपराधाच्या जाणिवेचे भाव नव्हते.यासारख्या घटनांचे वाढते प्रमाण हे भावी पिढीचे किती झपाट्याने अधःपतन होत आहे, हे दर्शवते. याला जबाबदार कोण आहे. याचे उत्तर ज्यांचे त्यांनीच मिळवावे…
आपल्या लहान पणी आपले आई-वडील आपल्या हातामध्ये एक रूपया ठेवताना खूप दा विचार करायचे…पण आता मात्र 20000-20000 किंवा त्यांच्या पेक्षा जास्त रक्कमेचे मोबाईल सहज आपल्या मुलांच्या हातात देत आहोत. अशी हि दिशाहीन झालेला पालक वर्ग…मग तो कुठे,कसा, कश्यासाठी वापरला जातोय काही देणं घेणं राहील नाही पालकांना.. आपल्या मुलांच्या आनंद त्यात शोधुन आई वडील खूप मोठी चुक करत आहेत…यांची त्यांना थोडीशी पण कल्पना राहतं नाही.


याचबरोबरआताच्या धावपळीच्या युगात अशी संस्कारक्षम पिढी निर्माण न होण्याची अनेक कारणे आहेत. आई-वडिलांना नोकरीमुळे मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात संस्कार करणारे आजी-आजोबाच नाहीत. त्यामुळे मुले लहान असतील, तर पाळणाघरात ठेवली जातात किंवा घरात बसून दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघण्यात स्वत:चा वेळ घालवतात. त्यात केबल, इंटरनेट, व्हिडिओ गेम घरोघरी आल्याने ही आधुनिक साधनेच मुलांच्या कोवळ्या मनावर कुसंस्कार करू लागली आहेत. पराकोटीची अश्‍लीलता, हिंसाचार, गुन्हेगारीचे भडक चित्रण ही आजच्या चित्रपटांची ओळख बनली आहे. निराशा, अपयश आल्यावर मृत्यूला कवटाळायचे असते, याचे धडे मुलांना अशा चित्रपटांतून मिळू लागले आहेत. याउलट पाश्‍चात्त्य समाज हिंदु धर्माने दिलेली संस्कृती, संस्कृत भाषा, अध्यात्म, भगवद्गीता आदी अनेक गोष्टींकडे जागतिक देणगी म्हणून पहात आहे.
काल परवा शाहरुख खान यांचा मुलांसाठी त्रस्त झालेल्या बाप म्हणून फोटो बघितला आणि खरं तर डोळ्यासमोरून तो फोटो किती तरी वेळ जात नव्हता. तो जो त्रास दिसत होता ना चेहऱ्यावर तो नक्की कशामुळे आहे…? मुलाला होणारा त्रास बघून व्यथित झालेला बाप ? मातीत मिळालेली अब्रू …? नियतीपुढे झालेली स्वतःच्या मजोरीपणाची हार…?? की पैश्याचा माज आणि आपण किती पुढारलेले आहोत हे सांगताना केलेला माज..?
स्वतः शाहरुख खान हा कुठलाही आधार न मिळवता बाॅलीवुडमध्ये स्वतः चे पाय रोवले आहेत.कारण तो असंख्य चटके सोसत इथं पर्यंत पोहचला आहे. परंतू त्याने
दिलेली मुलाखत आठवली. मुलांनी हवे ते करावे …व्यसन करावे, सेक्स करावा…आयुष्य उपभोगवं…त्याला हवं ते करावं….
एकूण काय आपल्या मुलाला हवं ते मिळावं अशी या मगरूर आणि माजोरी, पैश्याचा माज आणि घमंड असलेल्या बापाची इच्छा आणि त्याचे मत…
पण आपल्या मुलांनी सुखी रहाव असं वाटतं असेल तर नक्कीच त्यांना बाप म्हणून योग्य मार्ग दाखवणं किती महत्त्वाचं आहे हे आता सात स्वर्ग पार केले आहेत असे वाटणाऱ्या बापाला समजले पाहिजे.
पैसा आणि प्रसिद्धी वलय म्हणजे सर्व नाही आयुष्यात. नीतिमूल्ये जपणे किती महत्त्वाचे आहे जरी ती तुमच्या status ला outdated वाटत असली तरी …हे आता प्रत्येक पालकाने समजले पाहिजे आणि वेळीच मुलांना योग्य मार्ग दाखवून त्यांना पुढील धोके सांगितले पाहिजेत आणि यासाठी शाहरुख खान आणि त्याचा मुलगा हे उत्तम उदाहरण देता येईल.
एकूण काय तर आम्ही खूप पुढारलेले आहोत…पैसा आहे म्हणजे आम्ही काहीही करू शकतो…
या गैरसमजातून आता पालकांनी बाहेर यावे ..इतकेच….
कित्येक वर्ष सुखं उपभोगले तरी….पण एकदा का पापाचा घडा भरला तर मग इथेच हिशोब होणार….NCB वगैरे पण मार्ग आहेत या हिशोबाचे…वरच्याच्या काठीत आवाज नाही पण बसते बरोबर…त्यामुळे आपले कर्म आणि आपले संस्कार कसे हवे याचा विचार करायला लावण्यासाठी नक्कीच हे उदाहरण पुरेसे आहे.
सौ.रूचिरा बेटकर नांदेड
9970774211

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *