जालना : घनसावंगी तालुक्यातील सागर समर्थ कारखान्यातून केमिकल युक्त वाहून जाणारे दूषित पाणी आजूबाजूच्या परिसरातील शेतक?्यांच्या शेतात जात असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
या संदर्भात अनेक वेळा कारखाना प्रशासनला पत्र पाठवून दूषित पाण्याची विल्हेवाट लावन्याची मागणी केली परंतु निवेदनाची दखल घेतली गेली नाही, तसेच भूमिहीन कास्तकराच्या नावे सातबारा करा यासाठीही मागण्या केल्या याचीही दखल न घेतल्याने आज शिवसेना दलित आघाडीचे जिल्ह्या प्रमुख एड. भास्करराव मगरे यांच्या उपस्थितीत घनसावंगी तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणा बाजी करून पुन्हा या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Leave a Reply