जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी केंद्र पाचनवडगाव तालुका जालना येथील शाळेत आज दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी शासनाच्या नियमाप्रमाणे पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यापूर्वी ” नो मास्क नो एंट्री ” हे धोरण लागू करून त्यांच्याकडून पालकाचे संमती पत्र घेण्यात आले व त्यांची थर्मलगन द्वारे तपासणी करण्यात आली
तसेच ऑक्सी मीटरद्वारे त्यांची ऑक्सिजन लेव्हल देखील तपासण्यात आली आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाताला सॅनिटायझर करूनच शाळेच्या प्रवेशद्वारातून त्यांना प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी एक दिवस अगोदर संपूर्ण शाळेतील वर्गखोल्या आणि परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.
सदरील कार्यक्रम मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख अनंतकुमार शिलवंत यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम, श्रीमती विश्व लता गायकवाड, श्रीमती जनाबाई भुंबे उपस्थित होते.
Leave a Reply