ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जि. प.शाळेच्या चिमुकल्यांनी केले नैसर्गिक रंगधुळीचे आवाहन

March 16, 202214:35 PM 29 0 0

नांदेड : दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी रंगधुळवड मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून देशभरात कोरोना विषाणूची दहशत असल्यामुळे रंगधुळवडीचा रंगोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. आता तशी परिस्थिती नसली तरी धुलीवंदनाचा सण नैसर्गिक रंगाचा वापर करून साजरा केला पाहिजे असे साकडे सर्व ज्येष्ठ मंडळींना लिटल् मास्टर्स अवेरनेस पॅनेलने घातले आहे. रंगांना मानवी जीवनात खूप महत्त्व असले तरी धुलीवंदनाच्या दिवशी रसायनयुक्त रंगांचा वापर आरोग्यासाठी घातक असून रंगधुळ खेळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहनही जवळा देशमुख येथील प्रा. शाळेच्या चिमुकल्यांनी केले आहे. त्याचबरोबर १००% कोरोना लसीकरण जनजागृतीबाबत एकाने दोघांना त्या प्रत्येकांने इतर दोघांना प्रत्यक्ष अथवा फोनद्वारे याबाबत विनंती करणारी मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावरुनही हे आवाहन करताना होळी करायचीच असेल तर वाईट गुण, प्रवृत्ती, चालीरीती यांची करावी तसेच उन्हाळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता पाण्याचा अतिवापर टाळून कोरड्या व नैसर्गिक रंगांचा वापर करावा आणि धुळवड साजरी करावी असे म्हटले आहे. उच्च प्राथमिक व माध्यमिक विभागातील माजी विद्यार्थ्यांनी एक पॅनल तयार केले आहे. त्यातून ते पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याबाबत आणि रंगधुळीच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देत आहेत. या पॅनलमध्ये मुख्याध्यापक ढवळे जी, एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जातीधर्माची मुले सहभागी झालेली आहेत.

नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी आठवडाभरापासून ही मुले कार्यरत असून पळसफुले, काश्मिरी, रक्तचंदन, टोमॅटो, गाजर यांच्यापासून लाल रंग, झेंडूची व बाभळीची फुले, हळद, मैदा यांच्या पासून पिवळा, कोथिंबीर, पालक-कडुनिंब यांच्या पानांपासून हिरवा, बीटापासून गुलाबी, डाळिंबाच्या सालीपासून नारंगी, मेेंंदी, आवळ्यापासून काळा, चहा कॉफी निलगिरीची साल यापासून चाॅॅकलेेटी असे विविध प्रकारच्या वनस्पतींची पाने, फुले, फळे यांचा वापर करून नैसर्गिक रंग तयार करता येतात. रासायनिक रंगांमुळे त्वचेवर पांढरे डाग पडणे, डोळे जळजळ करणे किंवा डोळा निकामी होणे, केस गळणे,कानात रंग गेला तर कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. चुकून पोटात रंग गेल्यास अपचनाचे वा विविध प्रकारचे पोटाचे आजार संभवतात. असे घातक दुष्परिणाम टाळण्यासाठी धुळवड खेळतांना नैसर्गिक रंगांचाच वापर करावा असे आवाहन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *