पोषण आहार कार्यक्रम मौजे भोंजा हवेली ता.परंडा अंगणवाडी येथे महिलांना सिड. बियाणे किट वाटप व परसबाग पाहणी करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना पंचायत समिती परंडाचे (ABDO) सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. राठोड आर.ए. यांनी महिलांना पोषण आहार विषयी सविस्तर मार्गदर्शन करून आजुबाजुच्या व भवतालच्या स्वतःच्या परिसरामध्ये परसबाग करण्यासाठी बियाणे वाटप करून घरोघरी परसबाग स्थापन करून विषमुक्त पाले भाज्या आपल्या कुटुंबांना देऊन भविष्यात लहान मुला-मुलींना जास्तीत जास्त पालेभाज्या उभाराव्यात असे आव्हान केले.
यावेळी उपस्थित सरपंच राणी समाधान कोळी, कृषि अधिकारी श्री.वास्ते प्रशांत,कृषि विस्तार अधिकारी श्री.गायकवाड ,श्री बोडके एस. साहेब, ग्रामपंचायत उपसरपंच पती शिवाजी घाडगे, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, समाधान कोळी, दत्ता मोरे, रामराजे कोळी, अंगणवाडी सेविका,मदतनीस ताई संध्या कुलकर्णी, छबाबाई सरवदे, ग्रामसंघ सचिव सत्यशीला नेटके, का.अ.जोत्सना कोळी, भाग्यश्री नेटके, सिमा कुलकर्णी व महिला वर्ग उपस्थित होत्या.अशी माहिती हिरकणी पत्रकाराला मिळाली.
Leave a Reply