ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निफाडवाडी पेण आणि महाड भवन पनवेल येथील आदिवासी बांधवाना केलं फ्रेश ज्यूसचं वाटप

September 14, 202112:59 PM 3 0 0

गणेश चतुर्थी सणांच्या पावन पवित्र दिवसांत प्रत्येक भक्तांचा आनंद हा द्विगुणीत होतं असतो सोबतच जणंमाणसांत एक वेगळाचं उत्साह देखील निर्माण होतो…पण ह्या सणां – सुदीच्या दिवसात दूर-दुर्गम ,डोंगर- दऱ्यांत राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधावानां हे सण साजरे करायला सुद्धा खूप काबाड – कष्ट करूनच सण साजरे करावे लागतात त्यातच घरातील बेताची परिस्थिती आणि आत्ताच्या ह्या कोरोना काळामुळे तर त्यांचं जगणंच मुश्कील झालेलं आहे …अश्यातच ह्या सणां – सुदीच्या दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा त्यांनां देखील ह्या सणांचा आनंद घेता यावा …या करिता ह्या आदिवासी बांधवांच्या सुख- दुःखात ,त्यांच्या हाकेला सदैव धावून जाणारं व्यक्तिमत्त्व… श्री राजू मुंबईकर साहेब…यांनी आज ह्या गणपती उत्सवाच्या आनंदमय सोहळ्यात त्या आदिवासी बांधवाना देखील त्या सणाचा आनंद साजरा करता यावा ह्याच उदात्त हेतूने … केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक … सन्माननीय श्री राजू मुंबईकर साहेब….आणि …सामाजिक कार्यकर्त्या …सन्माननीय …सौ.संगिता ताई ढेरे मॅडम…यांच्या औदार्यातून ….निफाडवाडी आदिवासीवाडी पेण..आणि …. महाड भवन आदिवासी वाडी पनवेल…या दोन आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांनां …रिअल फ्रेश फ्रुट ज्यूसच्यां एक लिटर च्या टेट्रापॅकच्या पाकिटांचे वाटप प्रत्येक कुटुंबाला दोन दोन पाकिटं अश्या प्रकारे करण्यात आले.


निफाडवाडी ह्या आदिवासी वाडीवर …फ्रेश फ्रुट ज्यूसचं वाटप करण्याकरिता गेल्यावर …वाडीवरचे ….माजी सरपंच … श्री मारुती जी कुऱ्हाडे साहेब यांचे चिरंजीव … श्री धनाजी कुऱ्हाडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून …तेथील समाजहॉल मध्ये विराजमान झालेल्या….एक वाडी एक गणपती अश्या सुंदर उपक्रमाद्वारे विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेत त्या बाप्पाच्या चरणी छोटीशी भेट म्हणून आर्थिक मदत सुद्धा केली आणि त्याच समाजहॉल मध्ये उपस्थित सर्व आदिवासी बांधवाना फ्रेश फ्रुट ज्यूसचं वाटप करण्यात आले ..सोबतच *महाड भवन आदिवासी वाडी पनवेल ह्या आदिवासी वाडीवर सुद्धा ह्या फ्रेश फ्रुट ज्यूसचं… वाटप करण्यात आले त्या वाडीवर सुद्धा एक वाडी एक गणपती ह्याच सुंदर उपक्रमाद्वारे विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तिथे उपस्थित सर्व आदिवासी बांधवाना सुद्धा … फ्रेश फ्रुट ज्यूसचं वाटप करण्यात आले. ही आनंददायी मदत त्या चिमुकल्यानां आणि आदिवासी बांधवाना मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या जोगा होता.
ह्या सुंदर कार्यक्रमा दरम्यान महाड भवन आदिवासी वाडीवरील* विद्यमान ग्रा.पं.सदस्य … श्री पांडुरंग जी लेंडे यांनी आम्हां सर्वांचे स्वागत करून आभार मानले.त्याच सोबत श्री राजू मुंबईकर साहेबांनी त्या आदिवासी वाडीवरील बांधवानां एक वचन दिलं की आम्हीं दिवाळीत आपली दिवाळी गोड करण्या करता जरूर येऊ.
ह्या कार्यक्रमाकरीत …खास उपस्थिती दर्शवून सहकार्य केलं ते …गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे अध्यक्ष …श्री नवनीत पाटील, श्री अनिल घरत उरण तालुका सचिव :- आगरी,कोळी कराडी,संघर्ष सा.संस्था , सारडे विकास मंचचे …उपाध्यक्ष … श्री संपेश पाटील,श्री रोशन पाटील खजिनदार ,श्री कांतीलाल म्हात्रे, श्री मिलन पाटील , भूषण भुऱ्हे ,नितेश मुंबईकर अनिल घरत पिरकोन आणि सर्व आदिवासी बांधवांच्या आणि चिमुकल्या बाळगोपालांच्यां उपस्थितीत हा सुंदर सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *