ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रा.जि.प.शाळा सारडे येथील विद्यार्थ्यांना केलं रिअल फ्रेश नारळपाणी बॉटल्सचं वाटप

December 4, 202114:12 PM 40 0 0

केअर ऑफ़ नेचर संस्थेचे संस्थापक श्री राजू मुंबईकर साहेब आणि ….श्री समर्थकृपा सखी स्वयंसाहाय्यता संस्थेच्यां संस्थापक सौ. संगिताताई ढेरे मॅडम यांच्या औदार्यातून … व मित्र परिवार यांच्या सहकार्यातून आज रा.जि.प.प्राथमिक शाळा सारडे उरण येथील शालेय विद्यार्थ्यांना एका नामांकित ब्रँडच्या म्हणजेच डाबर कंपनीच्या रिअल फ्रेश नारळपाणी बॉटल्सचं वाटप करण्यात आले.

कोरोना काळात बंद असलेल्या शाळां दीड वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर आत्ता कुठे सुरू झाल्यात त्यातच शाळेत येण्यासाठी असणारी विद्यार्थ्यांची लगबग आणि शाळेच्या वर्गातील तो विद्यार्थ्यांचां किलबिलाट आज खूप महिन्या नंतर पाहायला मिळाला आणि लागलीच त्या विद्यार्थ्यांनां आज एक सुंदर अशी अनोखी भेंट सुद्धा मिळाली ती …श्री राजू मुंबईकर साहेब…आणि …सौ.संगिताताई ढेरे मॅडम व मित्रपरिवाराच्या वतीनं …रिअल फ्रेशफ्रुट ज्यूस …नारळपाणीच्यां बॉटल्सचं वाटप करून त्या विद्यार्थ्यांच्यां आरोग्याच्या फायद्याकरिता एक हेल्दी ड्रिंक्स देऊन त्या विद्यार्थी बाळगोपालांचा आनंद द्विगुणित करण्यात आला …आणि ही अनोखी आणि प्रेमाची भेंट ज्यांच्या औदार्यातून देण्यात आली त्यांचे शाळेच्या वतीनं भावस्पर्शी स्वागत केलं ते उपक्रमशील शिक्षक …आणि …आत्ताच काही दिवसापूर्वी ज्यांनां रायगड जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले ते …श्री कौशिक ठाकूर सर यांनी तर आभार प्रदर्शन केलं ते शाळेच्या मुख्याध्यापिका … सौ.उर्मिला म्हात्रे मॅडम यांनी. ह्या कार्यक्रमा करिता प्रमुख उपस्थिती दर्शविली ती …प्रख्यात निवेदक ज्यांनी ह्या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केलं ते गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष … श्री सुनिल वर्तक साहेब, श्री रोशन पाटील ( सामाजिक कार्यकर्ते सारडे), श्री हिराचंद म्हात्रे ( उपाध्यक्ष- गोल्डन ज्युबली मित्र मंडळ ), श्री अनिल घरत ( उरण तालुका सचिव- आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था ), गोपाळ म्हात्रे सर ( अंतरराष्ट्रीय कराटे कोच ), श्री क्रांती म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते सारडे ),श्री मिलन पाटील (सामाजिक कार्यकर्ते सारडे) सोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उर्मिला म्हात्रे मॅडम, श्री कौशिक ठाकूर सर,श्री सुनिल नऱ्हे सर पालक प्रतिनिधी …श्री प्रवीण पाटील आणि विद्यार्थी वर्गाच्या उपास्थितीत हा अनोखा आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *