ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप

January 28, 202213:54 PM 36 0 0

उरण ( संगीता पवार ) : प्रजासत्ताक दिनाचे व स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस मराठी कामगार सेना रायगड जिल्हा संघटक तथा मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचामाल येथील आदिवासी बांधवांना वाढत्या थंडीत मायेचा ऊबदार गारवा मिळावा यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्ताने व स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे युवा नेते सत्यवान भगत यांनी याही वर्षी चिरनेर येथील केळ्याचा माळ आदिवासी वाडी वरील कुटूंबियांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी आदिवासी बांधवांनी आपल्या कुटुंबासह सत्यवान भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या, याप्रसंगी आदिवासी बांधव, मनसेचे युवा पदाधिकारी महेश पाटील मनसे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत , मनसे विभाग अध्यक्ष दिपक पाटील , महाराष्ट्र सैनिक बबन ठाकूर , निखिल पाटील सह इतर मित्र मंडळी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *