ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोटरी क्लब ऑफ चेंबूर आणि मुक्ताई इंटरप्रायझेस सामाजिक संस्था, यांच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

December 23, 202113:52 PM 36 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.
जे . एन . पी . टी चे व्यवस्थापक
मा . श्री. नारायणप्रसाद कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ चेंबूर आणि मुक्ताई इंटरप्रायझेस सामाजिक संस्था, दादरपाडा ( उरण ) यांच्या वतीने विद्यालयातील गरीब, गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना २५ डझन वह्यांचे वाटप करण्यात आले .

सदर कार्यक्रमा प्रसंगी श्री . कुलकर्णी साहेब , मुक्ताई इंटरप्रायझेस चे संस्थापक अध्यक्ष श्री . मदन पाटील, विद्यमान अध्यक्ष श्री महेंद्र पाटील आणि शालेय शिक्षण समितीचे उपसभापती श्री . गणेश पाटील यांच्यासह म.गांधी माध्यमिक व उच्च उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. नाथा नाईक सर उपस्थित होते. माध्यमिक शिक्षणासोबत व्यावसायीक शिक्षण दिल्यास परिपूर्ण विद्यार्थी निर्माण होण्यास मदत होईल असे आपल्या मनोगतात रोटरी क्लबचे अध्यक्ष व जे.एन.पी.टी.चे व्यवस्थापक श्री. कुलकर्णीसाहेब यांनी व्यक्त करून मुक्ताईचे सर्वेसर्वा श्री. मदन पाटील यांच्या मार्गदर्शनानंतर श्री. मोकलसर यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *