उरण प्रतींनिधी (अश्विनी निलेश धोत्रे.) : केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत उरण नगरपरिषद हद्दीमध्ये स्थापन केलेले महिला बचत गट आणि वस्ती स्तर संघ यांचे माध्यमातून महाड येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि कपडे स्वरूपात दिनांक 31 जुलै 2021 रोजी मदत देण्यात आली.
सदरचा कार्यक्रम उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ सायली म्हात्रे मुख्याधिकारी श्री संतोष माळी उपनगराध्यक्ष श्री जयविंद कोळी श्री कौशिक शहा श्री रवी भोइर यांचे मार्गदर्शनानुसार घेण्यात आला तसेच या मदतीसाठी संजय पवार, कविता म्हात्रे, सारिका भोईर निता ठाकूर, अभया म्हात्रे, संपूर्ण थळी, शोभा पेडणेकर तसेच बचत गटातील महिलांनी योगदान दिले
Leave a Reply