उरण (संगिता पवार ) वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांच्या पत्नी हेमलताई यांच्या वाढदिवसानिमित्त चिरनेर चांदायली वाडीतील कूटूंबीयांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. तसेच वाडीतील काही आदिवासी बांधवाना आंब्याचे कलम रोप देण्यात आले. त्याचप्रमाणे चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थाच्या वतीने बेल डोंगरीत दहा हजार वृक्ष लागवड होत आहे त्या परिक्षेत्रात हेमलताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वन्यजीव संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा समजून तेथे पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या रोपे संस्थेकडे सुपूर्द केले आणि वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने पहिला रुद्राक्षाचे रोपन बेल डोंगरीत करुन वाढदिवस संपन्न झाले. रुद्राक्ष हा उरण तालुक्यातील वनक्षेत्र परिसरातील पहिलाच वृक्ष असेल त्यामुळे ह्या रोपाचे योग्य संगोपन होणे गरजेचे आहे, असे मत यावेळी किरण मढवी यांनी केले.
या वाढदिवसानिमित्त हेमलताई यांनी चांदायली वाडीतील अत्यंत गरीब गरजू विद्यार्थी हर्षद कातकरी यांचे दहावी पर्यंत शिक्षणासाठी सर्वोपरी मदत करणार असल्याने उपस्थितांनी हेमलताईंचे भरभररून कौतुक करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रायगड भूषण मनोज पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर, वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, काशिनाथ खारपाटील, प्रगतशील शेतकरी प्रशांत पवार, अतिश खारपाटील, अनिल कांबळे भरत कातकरी, आणि वाडीतील नागरीक उपस्थित होते.
Leave a Reply