उरण (संगीता ढेरे ) चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे सहसचिव उद्धव कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवघर स्टॉप, पागोटे ब्रिज झोपडपट्टी मध्ये 50 अन्न धान्य किट(तेल, मसाले, हळद, चहापावडर, साखर, मीठ, कांदे, बटाटे, तांदूळ, पारले बिस्किटे ) वाटप करण्यात आले तसेच 100 मास्क वाटप करण्यात आले.
चाईल्ड केअर सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपून अनेक उपक्रम आजपर्यंत राबविले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू, अध्यक्ष -कुणाल पाटील, कार्याध्यक्ष-विक्रांत कडू,सदस्य -आमोल डेरे, विपुल कडू, रोशन धुमाळ तसेच अन्न धान्य लाभार्थी उपस्थित होते. सदर झोपडपट्टीतील लोकांनी संस्थेचे सहसचिव उद्धव कोळी यांना आशीर्वाद दिले आणी संस्थेचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन कुणाल पाटील यांनी केले.
Leave a Reply