जालना ( प्रतिनिधी) : दास्यत्व आणि गुलामीतून महिलांना मुक्त करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी उपेक्षित, वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन म. फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत दादासाहेब बाबुलाल पंडित चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने उपेक्षित महिला आणि तृतीय पंथीयांना धान्य वाटप करण्यात आले. ट्रस्ट चे अध्यक्ष आनंद पंडित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सचिव विजयकुमार पंडित, रेखा निलंगेकर, भूषण पंडित, मिताली पंडित, सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई पवार, गणेश चांदोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आनंद पंडित म्हणाले की, अनिष्ट परंपरेने शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या महिलांना महात्मा जोतिबा फुले सर्वप्रथम स्ञी शिक्षणास पुढाकार घेत हक्क मिळवून दिला. समस्त स्ञी वर्गाने त्यांचे उपकार सदैव स्मरणात ठेवावे. असे आवाहन आनंद पंडित यांनी केले.
विजयकुमार पंडित यांनी शोषीत व उपेक्षित वर्ग केंद्रबिंदू मानून या वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी महामानवांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या कार्याचे अनुसरण व्हावे याच उदात्त हेतूने दादासाहेब बाबुलाल पंडित चॅरिटेबल ट्रस्ट कार्य करत असल्याचे विजयकुमार पंडित यांनी नमूद केले. प्रारंभी म. फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोना बाधित रूग्णांना सदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे या साठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी आरोही सुर्यवंशी, जोया खान, विद्या पौळ, श्रद्धा पवार, बिजली काळेबाग, रेणुका गोसावी, मनिषा वाघमारे, निशा पुरी, चमेली डाकोरे, शिवानी, तनूजा पठाण यांच्या सह आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply