जालना (प्रतिनिधी) ः शहरातील गांधीनगर भागात उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु आणि हातावर पोट असलेल्या गरीबांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सदरील अन्नधान्य हे लोकशाहीर आप्पासाहेब उगले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून सुरु आलेला लॉकडाऊन आणि आर्थींक मंदी यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे उज्वल बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने दगडू मोरे यांच्या स्मरणार्थ 10 कुटंबांना मोफत अन्नधान्याचे वाटप केले.
यावेळी प्रत्येकी 5 किलो गहु आणि 2 किलो तांदूळ वाटप करण्यात आला तर मागणी प्रमाणे पुन्हा विस किलो तांदुळ पाटप करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द, लोकप्रिय लोकशाहीर आप्पासाहेब उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत माफत अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणाताई मोरे, सचिव अच्युत मोरे, महाराष्ट्राचे टीव्ही स्टार शाहीर रामानंद उगले, प्रसिध्द ढोलकीपट्टू कल्याण उगले, आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक संजोग हिवाळे, अंनिस चे बंडूभाऊ डोंगरे, सामाजीक कार्यकर्ते भागवत राऊत, ग्रामविकास अधिकारी प्रवीण पवार, सावित्रिबाई उगले, आरती उगले यांची उपस्थिती होती.
Leave a Reply