ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवजयंती निमित्त रासप तर्फे फळ वाटप

February 19, 202215:02 PM 35 0 0

जालना (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय समाज पक्ष विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराम हुसे यांच्या नेतृत्वाखाली महिला व बाल रूग्णालयात फळे वाटप करण्यात आली.
ॲड. श्रीराम हुसे यांनी मातृशक्तीस प्राधान्य देणारे छत्रपती शिवराय यांच्या कार्याचे स्मरण ठेवून गरोदर माता सशक्त व्हाव्यात यासाठी जयंती निमित्त अल्पसा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. या वेळी ॲड. नितीन माळशिखरे, ॲड.शैलेश देशमुख, ॲड.संभाजी चुनखडे,
ॲड.अभिषेक सतकर, डॉ. बी. जी. घोलप, पी. डी. मापारे, राजश्री पळसकर, डॉ. मीना चव्हाण, डॉ. फायका, अधिपरिचारिका क्षीरसागर, सुरक्षा रक्षक खारडे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *