जालना दि.23- महाआवास अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे मुल्यमापन करुन जालना जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणारे तालुके, ग्रामपंचायती, व क्लस्टर यांना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, श्रीमती प्रभाताई गायकवाड, भागवत रक्ताटे, कल्याणराव सपाटे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, समाजातील प्रत्येक गोर गरिबाला त्याचे स्वतःचे व हक्काचे घर असावे अशी अपेक्षा असते. गोरगरिबांच्या हक्काच्या घराची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत जालना जिल्ह्याला अधिक प्रमाणात घरे मिळण्यासाठी आपण वयक्तिक प्रयत्नशील असल्याचे सांगत गतवर्षात जिल्ह्यासाठी 4 हजार घरकुले मंजुर करुन घेतली असुन चालु वर्षात 10 हजार घरकुलांची मागणी जिल्ह्यासाठी करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम मंठा, द्वितीय बदनापूर तर तृतीय जाफ्राबाद, राज्य पुरस्कृत आवास योजना- ग्रामीण, सर्वोत्कृष्ट तालुका, प्रथम जाफ्राबाद, द्वितीय बदनापुर तर तृतीय परतूर, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण सर्वोस्कृष्ट क्लस्टर प्रथम खोराड सावंगी, ता. मंठा, व्दितीय कोकाटे हदगांव, ता. परतुर, माहोरा ता. जाफ्राबाद राज्य पुरस्कृत आवास योजना- ग्रामीण, सर्वोस्कृष्ट क्लस्टर प्रथम गेवराई बाजार ता. बदनापूर, द्वितीय कोकाटे हदगाव ता. परतुर, तृतीय कुंभारझरी ता. जाफ्राबाद तर विभागून पुरस्कार केंधळी ता. मंठा, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सर्वोकृष्ट ग्रामपंचायत प्रथम खोरवड मोहदरी ता. मंठा, व्दितीय परतवाडी ता. परतुर, तृतीय वाळकेश्वर ता. अंबड, राज्य पुरस्कृत आवास योजना-ग्रामीण सर्वोकृष्ट ग्रामपंचायत प्रथम घोन्शी बु., ता. घनसावंगी, द्वितीय जवखेडा, ता. जाफ्राबाद, तृतीय अंबडगांव, ता. बदनापुर तर विभागुन देळेगव्हाण, ता. बदनापुर, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सर्वोकृष्ट ग्रामपंचायत उत्तेजनार्थ पुरस्कार उज्जैनपुरी, ता. बदनापुर,उत्तेजनार्थ पुरस्कार तपोवन, ता. भोकरदन, राज्य पुरस्कृत आवास योजना –ग्रामीण सर्वोकृष्ट ग्रामपंचायत उत्तेजनार्थ पुरस्कार पांगरीगोसावी , ता. मंठा, उत्तेजनार्थ पुरस्कार महाकाळा, ता. अंबड या कार्यक्रमास पदाधिकारी, संरपच,सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply