ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना शहरात गरजूंना किराणा साहित्याचे किट वाटप

May 11, 202119:29 PM 34 0 0

 

जालना/प्रतिनिधी देशात व राज्यात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाउन’ करण्यात आले असून, सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. ‘लॉकडाउन’मुळे दिव्यांग, गरजू, गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही गरज लक्षात घेवून जालना शहरातील जिजाऊ अर्बन पतसंस्थेमार्फत गरजूंना किराणा साहित्याची किट वाटप करण्यात  आली.

गरजू  कुटुंबांना समांतर अंतर ठेवून किराणा सामानाची वाटप करण्यात आले. . सध्या संचारबंदीमुळे मोलमजुरी बंद आहे. हातावरचे पोट असल्याने घरामध्ये बसून अनेक कुटुंबांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. अशा गरजूंना किराणाचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संचालिका श्रीमती मनिषा पाटील,श्रीमती सुवर्णताई राऊत, मॅनेजर सदाशिव पा. कोल्हे, जिजाऊ अर्बन स्थानिक सल्लागर मंडळाचे अध्यक्ष गजानन पा. वाळके, संचालक पांडुरंग देशमुख, पी. एन. काळे आदिंची उपस्थिती होती.

कलम 144 चा भंग न करता प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक अंतर ठेवून कुठलीही गर्दी न करता लाभार्थींना मदत करण्यात आली. साधारण 08 दिवस पुरेल इतका किराणा साहित्य या किटमध्ये देण्यात आले आहे. घरातील किराणामाल संपल्याने ही कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *