ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी,शाखा वैभववाडी मार्फत वारस संरक्षण निधीचे वितरण.

September 2, 202113:36 PM 82 0 0

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ही जिल्ह्य़ातील एक मोठी पतसंस्था असून ही संस्था आपल्या सभासदांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण व सभासदाभिमुख योजना राबवित असते. सभासदांचे हित जोपासण्याबरोबरच एखादा सभासद मयत झाल्यास त्याचे 100% कर्ज माफ करून त्या सभासदांच्या वारसास ही संस्था पंधरा लाख रूपये वारस संरक्षण निधी देत असते.


त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी,शाखा वैभववाडीचे सभासद कै.विजय संग्राम माने,(शाळा सडूरे चव्हाणवाडी) यांचे गेल्यावर्षी हृदयविकाराने निधन झाले होते. कुटुंबाचा आधारवड गेल्याने माने यांच्या कुटूंबावर फार मोठा आघात झालेला होता.अशा प्रसंगी कुटूंबाला मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी वैभववाडी शाखेमार्फत नुकतेच कै.विजय माने यांच्या पत्नी श्रीमती योगेश्वरी विजय माने यांना पंधरा लाख रूपयांचा चेक मान्यवर सभासदांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.यावेळी माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक श्री.संतोष मोरे,माजी उपाध्यक्ष श्री.शरद नारकर,श्री.रफिक बोबडे,श्री.विनोद करपे,श्री.दिनकर केळकर,श्री.शुद्धोधन गजभिये,श्री.शिवराज कर्ले,श्री.संजय साबळे,श्री.सचिन कांबळे,श्री.प्रल्हाद गर्कळ,श्री.प्रदीप नाळे,श्री.अनिल सुर्यवंशी,शाखाधिकारी सौ.अनुराधा माईणकर व श्री.अमोल पळसंबकर उपस्थित होते.
यावेळी विद्यमान संचालक श्री.संतोष मोरे यांनी संस्थेच्या विविध योजनांचा धावता आढावा घेऊन त्या योजनांचा अधिकाधिक सभासदांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करून उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *