ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्वर्गीय हाशिबाई नथुराम शिंदे स्मृतीदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

February 16, 202214:39 PM 45 0 0

उरण (तृप्ती भोईर) : पेण तालुक्यातील जुई अब्बास या गावचे रहिवासी आदरणीय श्री काशिनाथ नथुराम शिंदे गुरुजी यांच्या मातोश्री स्वर्गीय हाशिबाई नथुराम शिंदे यांचे निधन १४ फेब्रुवारी २००१ रोजी झाले होते. त्यानंतर येणाऱ्या त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनी त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी स्वर्गीय हाशिबाई नथुराम शिंदे यांच्या स्मरणार्थ पेण तालुक्यातील जुई अब्बास या गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुई अब्बास या शाळेसाठी ५००० रु चा निधी देण्यात आला होता.

आज २००१ ते २०२२ स्वर्गीय हाशिबाई नथुराम शिंदे यांचा आज १४ फेब्रुवारी २०२२ रोजी २१ सावा स्मृतीदिन आहे २००१ ला ५००० रू चा निधी जमा करण्यात आला होता या निधीतून येणाऱ्या व्याजाच्या पैशातुन दरवर्षी आज १४ फेब्रुवारी २०२२ आजही रा. जि.प. प्राथमिक शाळा जुई अब्बास याच दिलेल्या निधीतून आलेल्या व्याजदरातून शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहीत्य पेन, वह्या , पेन्सील, खोडरबर, शॉपनर इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. २१ वर्षापासुनची ही परंपरा आजही स्वर्गीय हाशिबाई शिंदे यांचे चिरंजीव आदरणीय श्री काशिनाथ शिंदे गुरुजी हे जपत आहेत. स्वर्गीय हाशिबाई शिंदे यांच्या पवित्र स्मृतींदिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे. १४ फेब्रुवारी या दिवशी स्वर्गीय हाशिबाई नथुराम शिंदे यांच्या पवित्र स्मृतींदिनानिमित्त रा‌ जि. प. प्राथमिक शाळा जुई अब्बास या शाळेत या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते.
स्वर्गीय हाशिबाई नथुराम शिंदे यांचे चिरंजीव आदरणीय काशिनाथ नथुराम शिंदे गुरुजी यांच्या वतीने होणारा विद्यार्थी गुणगौरव सोहळा या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. तांबोळी गुरुजी यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडत आहे.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शाळा जुई अब्बास १ ली ते ४ थी पर्यंत ची या शाळेची पटसंख्या फार कमी आहे याला कारण आजकाल प्रत्येक जण आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश न घेता इंग्रजी माध्यमातून शिक्षण देत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *