सातारा/रायगड (हिरकणी टिम) : शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फौडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी फौडेशनचे संस्थापक श्री तुषारदादा पाटील (नाशिक),अध्यक्ष संजयदादा राणे (मुंबई) उपाध्यक्ष प्रा.मनोज मुळे (बिड) सदस्य पप्पूदादा चौगुले(कोल्हापूर) रेखाताई हदवे (रोहा),पुजाताई मालुसरे (पुणे),मुरलीधर दादा काकड (जालना) यांच्या हस्ते पूरग्रस्त भागातील सुमारे सहाशे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तेराव्या वंशज डॉ. शीतल ताई मालुसरे ,साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीच्या कार्यकारी संपादक सौ विदयाताई निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पोलादपूर विद्यालयात शिवव्याख्याते ऋषिकेश पाटील यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाड येथील श्री विनीत दादा चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply