ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शहरात अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

January 25, 202213:22 PM 52 0 0

जालना : नगर पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या प्रयत्नाने अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे गणवेश वाटपाचा कार्यक्रम दिनांक 24 सोमवार रोजी आयोजित करण्यात आला. नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांच्या हस्ते सदरी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये खाकी गणवेश, आरटिक टोपी, विसल लायनर, बेल्ट, शोल्डर बॅच, नेमप्लेट इत्यादी तसेच युनिफॉर्म शूज, स्पोर्ट्स शूज, खाकी सोक्स,आणि ब्लॅक सोक्स, रेनकोट चे पूर्ण सेट तसेच ट्रॅक सूट, टी-शर्ट प्रति कर्मचारी दोन नग इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.

जालना अग्निशमन दलामध्ये एकूण 24 कर्मचारी असून प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना दरवर्षीप्रमाणे अत्यावश्यक सेवेमध्ये लागणारे साहित्य चे वाटप करण्यात आले. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली असताना अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक ठिकाणी नदीमध्ये, नाल्यांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचे जीव वाचवण्याचे काम केले आहे. तसेच शहरात व कार्यक्षेत्रात आग लागली असता या जवानांनी तत्परता दाखवून जीवित व मालमत्तेचे मोठे नुकसान होण्या पासून वाचवले आहे. अग्निशमन फक्त आगीपासुन जीवन आणि मालमत्ता वाचविणे आणि त्यापासूनचा दुष्परिणाम कमीत कमी करणे एवढेच नसुन बंद गटारे, विहीरी, उद्वाहन यंत्रे किंवा इतर यंत्रसामुग्री यात अडकून पडलेल्या नागरिकांसह इतर प्राणी मात्र यांची सुटका करणे आणि जीव वाचवण्याचे काम करत आहेत. अडचणींच्या किंवा आपतकालीन प्रसंगात अग्निशमन सेवा, कर्मचा-यांचे धैर्य आणि खास सामुग्री हाताळण्याचे खास प्रशिक्षण हे लोकांना सहाय्य करण्याकरिता उपयोगी पडते.

जिल्ह्यामध्ये कोविड – 19 चा प्रादुभाव वाढत असताना कार्यक्षेत्रात अग्निशमन दलामार्फत कोविड – 19 चा प्रादुभाव कमी करणेकरीता औषध फवारणी करण्यात आली. अग्निशमन दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करत आहे. यावेळी नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर, अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, (शिफ्ट इन्चार्ज.) संदीप दराडे, संतोष काळे, (फायरमन.) अब्दुल बासीद, नितेश ढाकणे, कमलसिंग राजपूत, राहुल नरवाडे, नागेश घुगे, रविनाथ बनसोडे, किशोर सगट, सागर गडकरी, सादिक अली, विठ्ठल कांबळे, अशोक गाढे, सुरज काळे, (टेलिफोन ऑपरेटर) रमेश बोरगावकर, रमेश सोनार, (वाहन चालक.) बाबुराव गवळी, अशोक वाघमारे, शेख रशीद, पंजाब देशमुख, विनायक चव्हाण, रवी तायडे, संजय हिरे, कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *