ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कुंडलिका नदी वरील पुलाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सहमती ने भूसंपादन करून रूंदी वाढवणार

September 29, 202115:07 PM 46 0 0

जालना ( प्रतिनिधी) : जालना शहरालगत असलेल्या कुंडलिका नदी वरील पुलाची जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी मंगळवारी ( ता. २८) पाहणी केली.परिसरातील शेतकऱ्यांच्या सहमती ने भूसंपादन करून पुलाची रूंदी वाढवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याच्या विश्वास डॉ विजय राठोड यांनी ग्रामस्थांना दिला. घनसावंगी सह शंभर गावांना जोडणाऱ्या जालना शहरालगत असलेल्या कुंडलिका नदी वरील पुलाचीतातडीने दुरुस्ती करून कठडे बसवावेत . अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सततच्या मुसळधार पावसामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. मंगळवारी ( ता. 28) दुपारी भर पावसात जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी रोहनवाडी नजीक असलेल्या कुंडलिका नदीवरील पुलाजवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी सचिन क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या हद्दीत येत असलेला सदर पुल हा अर्धवट बुजलेल्या स्थितीत आहे.

दुरुस्ती अभावी या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते परिणामी रोहनवाडी, लोंढेवाडी व घनसावंगी सह शंभर गावांचा जालना शहराशी असलेला संपर्क तुटतो. नादुरुस्त पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते .गतवर्षी याच पुलावरून दुचाकीसह तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती. याची आठवण सचिन क्षीरसागर यांनी सांगितली . या घटनेनंतरही प्रशासनाने अद्याप पर्यंत सदर पुलाची दुरुस्तीचे काम हाती घेतलेली नाही. शिवाय नादुरुस्त पुलावरून पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेकांना यापूर्वी आपले जीव गमवावे लागले आहेत. तरी प्रशासनाने तात्काळ सदर पुलाची दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी सचिन क्षीरसागर व रोहनवाडी ग्रामस्थांनी केली.
जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी ग्रामस्थांचा ञास लक्षात घेत पुलाची रूंदी वाढविण्यासाठी परिसरातील शेतकरी बांधवांच्या सहमती ने भूसंपादन करून प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला. या वेळी विश्वंभर चाळसे, आबा सुर्यवंशी, गणेश मैंद,
यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *