ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपीकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पहाणी

September 3, 202115:10 PM 7 0 0

जालना:- – सोमवारी जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत घनसावंगी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीपिकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शेतीला प्रत्यक्ष भेट देत झालेल्या नुकसानीची पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेत शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असुन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


या पहाणी प्रसंगी जि.प. चे उपाध्यक्ष महेंद्र पवार, भागवत रक्ताटे, कल्याणराव सपाटे,उत्तमराव पवार बाळासाहेब जाधव, रघुनाथ तौर, तात्यासाहेब चिमणे, नकुल भालेकर, अमरसिंह खरात, सुदामराव मुकणे, ताराचंद देवले, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर.शिंदे, उप अभियंता श्री निरवळ, गट विकास अधिकारी श्री जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावात शेतपिकांचे नुकसान झाले असून मूग, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर ऊस पीक आडवे झाल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच काही ठिकाणी रस्ते, पुल तसेच जनावरांचेही नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार या अतिवृष्टीमुळे 10 हजार हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे सांगत झालेल्या नुकसानीची माहिती मंत्रीमंडळासमोर ठेऊन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *