ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ग्राहकांच्या हक्कासाठी जिल्हा ग्राहक पंचायतने जनजागृती चळवळ उभी करावी ः ना. दानवे

March 22, 202113:39 PM 49 0 0

जालना प्रतिनिधी ः ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जालना जिल्हा ग्राहक पंचायतने जनजागृतीची चळवळ उभी करावी असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे बोलतांना केले. जालना जिल्हा ग्राहक पंचायत मार्फत ग्राहक दिनानिमित्त कायदा जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र माहिती व कार्यदिशा या पुस्तिकेचे विमोचन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या हस्ते आज रविवारी सकाळी भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी ग्राहक पंचायतचे जालना जिल्हाध्यक्ष मोहन इंगळे, सचिव ॲड. महेश धन्नावत, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष प्रा. विश्‍वंभर कुलकर्णी, डॉ. दिलीप लाड, प्रा. संजय पैठणकर, संघटक संजय देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज इंगळे आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना श्री. दानवे पाटील म्हणाले की, ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी तळागळातील सामान्य जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. ग्राहकांना गॅस घरपोच मोफत डिलिव्हरी व त्याचे योग्य वजन याबाबत जनजागृती करण्याबरोबरच ग्राहकांच्या हक्काची जाणिव तसेच त्यांच्या समस्या व अडीअडचणी समजुन घेवून त्या सोडविण्यासाठी जालना जिल्हा पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी चळवळ उभी करुन जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्राहक पंचायतचे जालना जिल्हाध्यक्ष मोहन इंगळे यांनी ग्राहक पंचायत संपूर्ण जिल्ह्यात कार्यान्वित असून सामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगीतले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संदर्भात माहिती डॉ. दिलीप लाड यांनी दिली तर जिल्ह्यातील कार्याबद्दल ॲड. महेश धन्नावत यांनी विस्तृत माहिती दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *