ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हाप्रमुख अंबेकरांचा शालेय जीवनातील आठवणींना उजाळा प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मानेगाव येथील शाळेस भेट

February 6, 202121:42 PM 119 0 0

जालना : शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या जालना तालुक्यातील त्यांच्या मानेगाव या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस भेट देवून जुन्या आठवणींना उजाळा देवून विद्याथ्र्यांंशी हितगुज केले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे शालेय जीवनातील संवगडी अशोक हंडे, एकनाथ हंडे, बबन पोहेकर, विठ्ठल पडुळ, रामा गायकवाड तसेच जालना नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाबुराव पवार, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, मुख्याध्यापक संदीप कुलकर्णी, सरपंच पद्माकरहंडे,रामा जाधव यांचीही यावेळी उपस्थिती होती.

विद्याथ्र्यांशी संवाद साधतांना आपल्या शालेय जिवनातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. तसेच तत्कालीन शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव देशपांडे यांचा आवर्जुन उल्लेख करीत अत्यंत गुणवत्तापुर्ण शिक्षण त्या काळात या शाळेतून मिळाल्याचे त्यांनी नमुद केले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी ठरविल्यास आजही अनेक गुणवंत शाळेतून घडवू शकतात. हे मानेगाव येथील शिक्षकांनी दाखवून दिल्याचे अंबेकर म्हणाले. या शाळेत शिक्षण घेवून साहित्य क्षेत्रात रुस्तुम आचलखांब, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. धारुरकर तर राजकीय क्षेत्रात स्वतः भास्करराव अंबेकर यांनी नावलौकिक मिळविल्याचे सांगितले. तर आपणही अत्यंत चांगला अभ्यास करुन आपले गाव, शिक्षक व आई-वडीलांचे नाव मोठे करा, आता अत्यंत चांगल्या सुविधा, पुरेसा शिक्षक वर्ग, आधुनिक शिक्षण पध्दती उपलब्ध झाल्याने आपणास या स्पर्धेच्या युगात चांगले शिक्षण देण्याचे काम येथील शिक्षक सातत्याने करीत असल्याचे शाळेच्या नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परिक्षा यांच्या निकालावरुन लक्षात येत असल्याचे ते म्हणाले. शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले व विद्याथ्र्यांशी संवाद साधून त्यांच्या अडअडचणी जाणून घेत विद्याथ्र्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक संतोष नागवडे, मंजुषा मोरे यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *