ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व हयुमन चाईल्ड वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन सोसायटी,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मानवधिकार दिन साजरा

December 11, 202014:44 PM 148 0 0

आज दि.10.12.2020 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व हयुमन चाईल्ड वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन सोसायटी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मानवधिकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्रीमती सुवर्णा कि केवले मॅडम (प्रमुख-जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना) हे होते प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री. अब्दुल रफिक अ.रशिद (अध्यक्ष हयुमन चाईल्ड वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन सोसायटी जालना), श्रीमती मंगला धुपे शिक्षणाधिकारी (प्रौढ़ उपशिक्षणाधिकारी प्रा.जालना) न्यायाधीश मा.श्री आर. बी.पारवेकर (सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना), प्रमुख वक्ते , अॅड,. श्री.जे.एस.भुतेकर (जेष्ठ विधीज्ञ) व मा.अॅड. श्री. के. ओ.रत्नपारखे यांनी मानवधिकार विषयी वक्तव्य केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जालना श्रीमती सुवर्णा कि.केवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले आहे की, “आपण ह्युमन बिईंग आहोत. एखादे पद असल्याने कोणी पण मोठे होतात पण मानव म्हणून मोठे होणे ही वेगळी गोष्ट आहे. जसे आपले अधिकार आहे तसेच ईतर माणसांचे अधिकार समजणे योग्य वाटते.कोणाचीही हानी होणार नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, मानवतेचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”

शिक्षणाधिकारी (प्रौढ) उपशिक्षणाधिकारी प्रा. जि.प.जालना श्रीमती मंगला धुपे यांनी महिला व बालकांना मानवधिकार विषयी मार्गदर्शन केले. अब्दुल रफिक अ. रशीद (अध्यक्ष-ह्युमन चाईल्ड वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन सोसायटी जालना) यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, “धर्म आणि मानवता ह्या दोघांचे नाते एकमेकांशीआहे. जर धर्मामध्ये मानवता नाही, तो धर्म, धर्म नाही. प्रत्येक माणसाने
समाजात मानवधिकार विषयी समजणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमात मानवअधिकार व धर्म निरपेक्षता ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण होईल.”

मा.अॅड.श्री.जे.एस.भुतेकर ज्येष्ठ विधीज्ञ यांनी मानवधिकार विषयी वक्तव्य
सादर केले. मा.अॅड. श्री.के.ओ.रत्नपारखे यांनी मानव अधिकार विषयी जाती धर्माच्या
पलिकडे जी गोष्ट आहे ती आमची मुलभूत हक्क आहे, म्हणुन विचार व्यक्त केले.

नाजीया लतीफ खान,सिराज अब्दुल खान व आस्मा निसार खान, या
विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले.

कोविड योध्दाने सन्मान
मानवधिकार दिनानिमित्त कोविड-19 काळात लॉकडाऊन/संचारबंदी च्या वेळी गोरगरीबांना धान्य वाटप, किराणा, वैद्यकिय सेवा, औषध व इतर सेवा करणा-या योध्दांना “कोविड योध्दा” म्हणुन सम्मानित केले. कैलास भुजंगराव जावळे (हे.काँ.) कदिम जालना पोलीस स्टेशन जालना,मंगला धुपे,उपशिक्षणाधिकारी,जालना,अॅड.कल्पना त्रिभुवन, तुकाराम सरदार, (सामाजिक कार्यकर्ते) डॉ.जफर एकबाल (नुर हॉस्पीटल जालना), अमजद खान अकबर खान (सामाजिक कार्यकर्ते), अमजद खान ताजोद्दीन खान (सामाजिक कार्यकर्ते) सय्यद अफसर स.सिकंदर (सामाजिक कार्यकर्ते), शेख अतिकअय्युब (बदनापुर) या सामाजिक कार्यकर्त्यांना “कोविड योध्दा” म्हणुन मानवधिकार दिनाच्या वेळी, मा.श्री.न्यायाधिश आर.बी.पारवेकर तथा न्यायाधिश सुवर्णा कि.केवले मॅडम यांच्या हस्ते प्रमाण पत्र देवुन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.बी.पारवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.के.ओ.रत्नपारखे यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *