मुरूड जंजिरा ( प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील विद्यामंदिर इंदापूर हायस्कूल येथे.अभिवाचन कार्यशाळा व कविसंमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. को. म. सा. प. दक्षिण रायगड चे अध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषद मुरूड जंजिरा शाखेचे अध्यक्ष संजयजी गुंजाळ, केंद्रिय संमेलन प्रमुख सुधीर शेट , जिल्हा समन्वयक अ. वि.जंगम ,पत्रकार संस्थापक कोमसाप तळा शाखा- पुरुषोत्तम मुळे,नवजीवन विद्यामंदिर इंदापूर शाळेचे मुख्याध्यापक मारुती लावंड व मान्यवर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. आयोजकांच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.कार्यशाळेचे प्रास्ताविक तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी अतिशय सुंदर केले.यावेळी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.कार्य शाळेचे उद्घाटक सुधीर शेट यांनी उद्घाटनिय सत्रात सर्वांना मार्गदर्शन केले.साहित्यिक ,कवी प्रा. प्रणय इंगळे यांनी अभिवाचन संबंधी सर्वाँना मार्गदर्शन केले.विविध उदाहरणे व उत्तम अभिवाचनाचे नमुने सादर केले.
कविसंमेलनात 30 कवी ,कवयित्री यांनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.सामाजिक विषय,पर्यावरण ,निसर्ग इत्यादी विषयांवर मान्यवर कवी कवयित्री यांनी कविता सादर केल्या. मनोगतात मान्यवरांनी कार्यशाळा , कविसंमेलन आयोजक व संयोजकाचे कौतुक करून यशस्वी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. साहित्याचा मधुघट समूहाचे प्रशासक रघुनाथ पोवार, अजित शेडगे, सिद्धेश लखमदे, हेमंत बारटक्के, श्रेयस रोडे यांनी यशस्वी नियोजन केले.
कोमसाप तळा शाखेचे अध्यक्ष हेमंत बारटक्के, उपाध्यक्ष भरत जोशी, सचिव विजय पवार ,कोमसाप तळा शाखेचे अध्यक्ष हेमंत बारटक्के, कार्याध्यक्ष संदीप जामकर, श्रीकांत खताळ,उल्का माडेकर, रंजना खांडेकर, विद्या मांडवकर, कल्पना पवार, सुप्रिया जामकर इत्यादींनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. अतिशय आनंददायी व उत्साहवर्धक वातावरणात कार्यशाळा व कविसंमेलन संपन्न झाले.
Leave a Reply